मुंबई -कुठल्याही शेतकर्यांना अडचणीच्या काळात अडचणीत राहू देणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार असून कॅबिनेटच्या बैठकीत सरकार निश्चितरुपाने मदत जाहीर करेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
'शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत' - महाराष्ट्र राज्य बातमी
शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार असून कॅबिनेटच्या बैठकीत सरकार निश्चितरुपाने मदत जाहीर करेल. तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने केंद्रानेही मदत करावी, अशी अपेक्षा असल्याचे मंत्री नवाब मलिक म्हणाले.
विविध जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (दि. 19 ऑक्टोबर) दौऱ्यावर आहेत. तर कालपासून (दि. 18 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा सुरू केला. त्याच पार्श्वभूमीवर मलिक यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून त्यांना वार्यावर सोडणार नाही त्यांना लवकरच मदत केली जाईल.
हेही वाचा -महापौर व चिटणीसांनी राजीनामा द्यावा; भाजपाची महानगरपालिका मुख्यालयात निदर्शने