महाराष्ट्र

maharashtra

'महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का?'

By

Published : Oct 4, 2020, 4:57 PM IST

सुशांतची हत्या की, आत्महत्या असा संशय निर्माण झाल्याने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे देण्यात आला. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले होते. मात्र, ही आत्महत्या असल्याचेच स्पष्ट होत असल्याने आता आघाडी सरकारमधील नेते टीका करत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड

मुंबई - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर काही माध्यमांनी ही आत्महत्या नसून त्याची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला. सुशांत हा बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा बळी आहे वैगेरे, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, एम्स रुग्णालयाच्या अहवालातून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून टीका केली आहे.

सुशांतसिंह प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स, मराठी भैय्ये आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआयने मान्य केले आहे की, सुशांतने आत्महत्याच केली आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का? असा ट्विटरवरून प्रश्न त्यांनी विचारला आहे. मात्र, हे मराठी भैय्ये कोण? हे नेमके समजत नसून सोशल मीडियावर यावर तर्क-वितर्क लावले जात आहेत.

सुशांतची हत्या की, आत्महत्या असा संशय निर्माण झाल्याने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे देण्यात आला. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले होते. मात्र, ही आत्महत्या असल्याचेच स्पष्ट होत असल्याने आता आघाडी सरकारमधील नेते टीका करत आहेत.

हेही वाचा -आता स्निफर डॉग करणार मुंबईकरांची सुरक्षा; मोनोरेल सुरक्षा पथकात 20 श्वानांचा समावेश

हेही वाचा -खूशखबर..! यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा

ABOUT THE AUTHOR

...view details