महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले' - मराठा आरक्षण

भाजपा सरकारने दिलेल्या विधितज्ज्ञांच्या जोडीने विद्यमान सरकारनेही नामवंत व अभ्यासू वकील दिले होते, त्यांनी अपेक्षित सर्व दाखले, कागदपत्रे माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, असे असतांनाही सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला निकाल अनपेक्षित आणि निराश करणारा असल्याचे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

By

Published : May 5, 2021, 9:21 PM IST

मुंबई -मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले, भाजपा सरकारने दिलेल्या विधितज्ज्ञांच्या जोडीने विद्यमान सरकारनेही नामवंत व अभ्यासू वकील दिले होते, त्यांनी अपेक्षित सर्व दाखले, कागदपत्रे माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, असे असतांनाही सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला निकाल अनपेक्षित आणि निराश करणारा असल्याचे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

थोरातांचे प्रसिद्धीपत्रक



देशातील अनेक राज्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण आहे, असे असतानाही सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारबाबत असा निर्णय देणे अनाकलनीय आहे. मराठा समाजात या निकालाने निर्माण झालेली अन्यायाची भावना दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकार हरतऱ्हेने प्रयत्न करेल. मराठा समाजाच्या जोडीने न्यायासाठी संघर्ष करेल, अशी खात्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकामार्फत दिली आहे. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी एकत्रितपणे आजवर मराठा आरक्षणाचा लढा लढला आहे. यापुढेही ही लढाई आपल्याला एकत्र येऊनच लढायची आल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच विरोधी पक्षांनी चुकीची माहिती देऊन गैरसमज निर्माण करू नये, असेही या पत्रकातून त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-देवेंद्र फडणवीस हेच आरक्षण कायद्याच्या विरोधात; नवाब मलिक यांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details