मुंबई - मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. आरे वसाहतीमध्ये आज लसीकरण शिबीराचा शुभारंभ पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मंत्री ठाकरे यांनी दिली.
एकही आदिवासी बांधव लसीकरणापासून वंचित राहणार नाही - मंत्री आदित्य ठाकरे - लसीकरण केंद्राचे उद्घाटन
लसींच्या उपलब्धतेनुसार पुढील काही दिवसांत सर्वांना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगून ठाकरे यांनी एकही आदिवासी बांधव यापासून वंचित राहणार नसल्याचे आश्वस्त केले.
आरे वसाहतीतील अनुसूचित जमातीच्या रहिवाशांसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. तसेच लसीकरण शिबिराचे ठाकरे यांच्या हस्ते आज खांबाचा पाडा येथे त्याचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या वतीने लसीकरणाचा वेग वाढवला जातो आहे. लसींच्या उपलब्धतेनुसार पुढील काही दिवसांत सर्वांना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगून ठाकरे यांनी एकही आदिवासी बांधव यापासून वंचित राहणार नसल्याचे आश्वस्त केले. याचबरोबर आरे वसाहतीचा शाश्वत विकास केला जाणार असून मुख्य रस्त्याचे काम मुंबई पालिकेच्या माध्यमातून येत्या ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.