महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. पायल तडवी खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवा - मिलिंद देवरा - Milind Deora

आज देवरा यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची पोलीस मुख्यालयात भेट घेतली. यावेळी देवरा व काँग्रेस नेत्यांनी आपल्या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांना दिले आहे.

मिलिंद देवरा

By

Published : May 28, 2019, 6:42 PM IST

मुंबई- डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा खटला त्वरित जलद न्यायालयात चालवावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केली आहे. आज देवरा यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची पोलीस मुख्यालयात भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

आज देवरा यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची पोलीस मुख्यालयात भेट घेतली

मुंबईच्या नामांकित नायर रुग्णालयात असा प्रकार होणे हे योग्य नाही. नायर रुग्णालयात एका तरुण डॉक्टरने आत्महत्या केली ही बाब गंभीर आणि दुर्दैवी आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, ही मुंबई काँग्रेस व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मागणी असल्याचे मिलिंद देवरा म्हणाले. मुंबईतील शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारे जातीवादाला थारा मिळता कामा नये, असेही देवरा यांनी म्हटले.

पायल तडवी प्रकरणी आरोप असलेल्या डॉक्टरांना त्वरित अटक करावी, सदर खटला अट्रोसिटी कायद्याअंतर्गत स्थापित विशेष फास्ट ट्रक कोर्टात चालवावा व खटला चालवण्यास अनुभवी वकिलांची नेमणूक करावी, अशा मागणीचे निवेदन देवरा व काँग्रेस नेत्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. यावेळी आमदार वर्षा गायकवाड, चरणसिंग सपरा व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details