मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या काळात अनेक परप्रांतीय कामगार मुंबईत अडकले आहेत. सरकारने त्यांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे, पण ते प्रयत्न अपुरे पडत आहेत.
मुंबईतील परप्रांतीय कामगार घरी जाण्यास व्याकुळ - परप्रांतीय कामगार मुंबईत अडकले
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या काळात अनेक परप्रांतीय कामगार मुंबईत अडकले आहेत. त्यांनी सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
परप्रांतीय कामगार घरी जाण्यास व्याकुळ
सरकारतर्फे श्रमिक एक्स्प्रेस नावाने रेल्वे गाड्या रवाना झाल्या तरी ते उपाय अपुरे पडत आहे. आज या कामगारांना हाताला काम नाही. घरी जायची सोय नाही. त्यामुळे मुंबईत त्यांचे जगणे असह्य झाले आहे. अशा काही परप्रांतीय कामगारांचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला आहे. रस्त्यावरील लहान फेरीवाल्यांचे पोट हातावर असते. रोज जसा माल विकला जाईल तशी कमाई होत असते. मात्र, आता सगळेच बंद असल्याने त्यांच्याही पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे.