मुंबई - राज्यात आज ५ हजार ६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा १४ लाख ६० हजार ७५५ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.८ टक्क्यांवर पोहोचले आहे. दिवसभरात राज्यात आज ६ हजार ५९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्यादेखील कमी होऊन १,४०,४८६ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
महाराष्ट्र कोरोना : राज्यात ६,०५९ नवीन रुग्ण, ११२ रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना न्यूज
राज्यात आज ११२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण ४३,२६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
महाराष्ट्र कोरोना अपडेट
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८६,०८,९२८ नमुन्यांपैकी १६,४५,०२० नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात २५,१८,०१६ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या १३,५७२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज ११२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण ४३,२६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.