मुंबई -नवी मुंबई शहरात केबल आणि इतर कंपनीच्या वायर कशाही प्रकारे टाकल्यामुळे मंगळवारी तुर्भे ब्रिज येथे दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झालेला आहे. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे.
तुर्भे ब्रिज येथे मोटारसायकलचा अपघात झाला आहे हेही वाचा - दुरुस्तीवर लाखोंचा निधी खर्च; तरी केडीएमटीला प्रवाशांचा दे धक्का!
नवी मुंबईतील तुर्भे ब्रिजजवळ अस्ताव्यस्त अवस्थेत केबल टाकण्यात आल्या आहेत. याकडे मनपा अधिकारी, एम ए सी पी वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने एका दुचाकीस्वारचा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त व्यक्तीस स्थानिक रुग्णालयात प्रवाशांनी दाखल केले असून याप्रकारे अनेक अपघात घडत आहेत, असे आरोप वाहन चालक करीत आहेत.
हेही वाचा - शिक्षणात अडथळा ठरणाऱ्या छोट्या बहिणीला जीवे मारण्याचा प्रयत्न