मुंबई:मध्य रेल्वेमार्गावरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सर्व लोकल सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकावर थांबतील. त्यानंतर मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाऊन मार्गावर वळविण्यात येतील.
या लोकल सेवा आपल्या नियोजित वेळे पेक्षा 15 मिनिटे उशिराने पोचतील. ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 पर्यत सुटणाऱ्या अप धीम्या सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शिव या स्थानकांवर थांबून पुढे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. नियोजित वेळे पेक्षा 15 मिनिटे उशिराने पोचतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 11. 10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आले आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी 10.34 ते 3.54 वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशी सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.