मुंबई - आरोग्य विभागातील ’क’ आणि ‘ड’ क्षेणीतील एकूण 11 हजार पदांची मेगाभरती होणार आहे. आरोग्य विभागातील भरतीमुळे विरोधी पक्षांनी अनेकवेळा राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. अखेर आता आरोग्य विभागात मेगाभरतीची घोषणा राज्य सरकारनं केली. (Health Department Recruitment) (Health Department Recruitment 2023) (Maharashtra Health Department) (Health Department Job)
मंगळवारी पत्रकार परिषद - तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विभागात भरती पार पडली होती. पण या परीक्षेमध्ये पेपर फुटीमुळे मोठा घोळ समोर आला होता. त्यानंतर ही भरती प्रकिया थांबली होती. त्यानंतर राज्यातील सत्तानाट्यामुळं भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. अखेरीस नव्यानं भरती प्रक्रिया काढण्यात आली. मंगळवारी(28 ऑगस्ट) आरोग्य विभागाकडून पत्रकार परिषद घेवून सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
घोटाळ्यामुळं रखडली होती भरती - पेपर फुटीचा घोटाळा झाल्यामुळे आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. 2021 पासून ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता पुन्हा ही भरती सुरू होणार आहे. TCS मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ’क’ आणि ‘ड’ गटातील एकूण 11 हजार पदांची मेगाभरती होणार आहे. ’क’ आणि ‘ड’ वर्गातील विविधं पदांची ही भरती होणार आहे.
कुठे किती पदांची गरज - राज्यातील आरोग्य सेवा ही कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळं आता 'व्हेंटिलेटर'वर आली. राज्यात संचालक, सहसंचालक आणि जिल्हा चिकित्सकांसह सुमारे 17 हजार 864 पदे रिक्त आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांची कमतरता असल्यामुळं गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांची आणि औषध दुकानांची वाट धरावी लागते. मुंबई महानगरपालिकेच्या केएम, नायर आणि सायन या रुग्णालयांमध्ये चतुर्थ श्रेणी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं पदं रिक्त आहेत. नियमानुसार एका कक्षामध्ये 40 रुग्ण अपेक्षित असताना या ठिकाणी सरासरी सव्वाशे ते दीडशे रुग्ण आढळतात तर सहा रुग्णांसाठी एक परिचारिका हे प्रमाण असताना पालिकेच्या रुग्णालयात 40 रुग्णांमध्ये एक परिचारिका काम करत असल्याचं दिसतं. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचारिकांची 50 हजार पदं रिक्त आहेत, असा दावा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
हेही वाचा -सिझेरियन ऑपरेशन करताना पोटात विसरला कापूस, महिलेचा मृत्यू