महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; मुंबईकरांचे होणार मेगाहाल - STATION

प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल-मानखुर्द-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील. हार्बरवरील प्रवाशांना रविवारी सकाळी १० ते दुपारी ४.३० पर्यंत ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेने प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मेगाबॉक

By

Published : Apr 28, 2019, 9:26 AM IST

मुंबई - आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर लाईनवर होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे आज मेगाहाल होणार आहे. पश्चिम रेल्वेवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर लाईनवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असून, मध्य रेल्वेवर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर मुलुंड-माटुंगा आणि वडाळा रोड-मानखुर्द या स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

बोरिवली ते अंधेरी अपडाऊन स्लो ट्रॅक असून या दरम्यान मुलुंड ते माटुंगा मार्गावर अप जलद असणार आहे. ब्लॉक काळात अप मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत सीएसएमटीकडे येणाऱ्या आणि सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकल सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉकमुळे दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच धावणार असून, याच स्थानकातून ती पुन्हा रवाना होईल.

हार्बर रेल्वेवरील वडाळा रोड ते मानखुर्द मार्गावर अप आणि डाऊनवर धावणार आहेत. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉककाळात हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल-मानखुर्द-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील. हार्बरवरील प्रवाशांना रविवारी सकाळी १० ते दुपारी ४.३० पर्यंत ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेने प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते वांद्रे मार्गावर अप आणि डाऊनवर गाड्या धावणार असून, सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉककाळात धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर वळण्यात येणार आहे. विलेपार्ले स्थानकात लोकलला अतिरिक्त थांबा देण्यात येईल, तर राम मंदिर स्थानकात प्लॅटफॉर्म नसल्यामुळे लोकल उपलब्ध राहणार नाहीत. बोरिवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३, ४ वरून कोणतीही लोकल मार्गस्थ होणार नाही.

ठिकाण आणि वेळ -

पश्चिम रेल्वेवर १०.३५ ते ३.३५ वर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर ११.१५ ते ३.१५ पर्यंत मेगाब्लॉक
हार्बरवर ११-१० ते ४.१० पर्यंत मेगाब्लॉक
मुलुंड-माटुंगा अप फास्टवर मेगाब्लॉक
बोरिवला-अंधेरी अप डाऊन स्लो ट्रॅकवर
वडाळारोड - मानखुर्द अपडाऊन ट्रॅकवर

ABOUT THE AUTHOR

...view details