मुंबई -एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा सामना तर दुसरीकडे राजकीय आरोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळतात. संजय राऊत यांच्या राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरे स्मारकात आणखी एक महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.
ठाकरे स्मारकात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आढावा बैठक; मुंबईत राजकीय घडामोडींना वेग - मुंबई लेटेस्ट न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.
ठाकरे स्मारकावर पार पडलेल्या बैठकीत जयंत पाटील आणि अजोय मेहता हे देखील उपस्थित होते. यामध्ये मुख्यत्त्वे राज्याचे अर्थचक्र कशा पद्धतीने पुन्हा रुळावर आणायचे, केंद्राकडून महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करण्यासाठी केंद्राशी कशी बोलणी केली पाहिजे. ३१ तारखेनंतर रेडझोनमध्ये कोरोना कशाप्रकारे उपाययोजना केल्या जाव्यात, याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत कोरोना संदर्भातील उपाययोजना यासोबतच राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरही चर्चा झाल्याची शक्यता आहे.