मुंबई - वांद्रे येथील गर्दी पूर्वनियोजित होती का, याचा पोलीस तपास घेत आहेत. याप्रकरणी चिथावणी देणाऱ्या विनय दुबेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशा घटना टाळण्यासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणाऱ्या प्रतिनिधींनीही बातमीची पडताळणी करावी, अशी विनंती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांना केली आहे.
प्रसार माध्यमांनी बातमीची पडताळणी करून वृत्त प्रसारित करावे - महापौर - समाजविरोधी बातम्या
मुंबईचे वातावरण खराब होऊ शकेल, अशा बातम्यांना बळी पडू नका. बातमीची सत्यता पडताळणी करून खात्री करा, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
केंद्र-राज्य व महानगरपालिका एकमेकांच्या हातात हात घालून यशस्वीपणे काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे उत्तम पणे काम करत आहेत. मुंबईचे वातावरण खराब होऊ शकेल अशा बातम्यांना बळी पडू नका. बातमीची सत्यता पडताळणी करून खात्री करा, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
डॉक्टर ते अत्यावश्यक सर्व कर्मचारी सर्व पातळींवर काम करत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढू न देण्यासाठी घरी राहा, सामाजिक अंतर पाळा आणि सुरक्षित राहा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.