महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतला दादरच्या भाजी मार्केटचा आढावा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र, तरीही काही सर्वसामान्य नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन केल्या जात नाही. याच पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सकाळी दादर पश्चिमच्या भाजी मंडईला भेट दिली.

mayor-kishori-pednekar-visit-vegetable-market-in-dadar
मुंबई : महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतला दादरच्या भाजी मार्केटचा आढावा

By

Published : Feb 23, 2021, 11:17 AM IST

मुंबई -मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र, तरीही काही सर्वसामान्य नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन केल्या जात नाही. याच पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सकाळी दादर पश्चिमच्या भाजी मंडईला भेट दिली. यावेळी त्यांनी मुंबईत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना चांगलेच खडसावले.

प्रतिक्रिया

त्रिसूत्रीचा पालन करणे आवश्यक -

नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे तसेच सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे झाले आहे. पण तरीही काही नागरिक विनामास्कचा मुक्तपणे वावर करीत आहे. तर काही नागरिक मास्क वापरताना नाकाखाली तसेच गळ्याभोवती गुंडाळलेल्या अवस्थेत घालतात. अशाप्रकारे मास्कचा वापर करणे चुकीचे आहे. तसेच क्लीनअप मार्शलची संख्यादेखील आम्ही वाढवली आहे. मुंबई पोलिसांनादेखील विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

हेही वाचा - पाच सत्रात शेअर बाजार निर्देशांकात २,४१० अंशांची घसरण; ही आहेत चार कारणे

ABOUT THE AUTHOR

...view details