मुंबई: मुंबईतील सत्र न्यायालयातील (Mumbai session court) विशेष पॉस्को न्यायालयाने उर्दू शिकवणाऱ्या मौलवी शिक्षकाला आठ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणात (sexual harassments of minor girl) वीस वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (maulvi 20 years jail).
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात मौलवीला 20 वर्षांची शिक्षा - मौलवीला 20 वर्षांची शिक्षा
मुंबईतील सत्र न्यायालयातील (Mumbai session court) विशेष पॉस्को न्यायालयाने उर्दू शिकवणाऱ्या मौलवी शिक्षकाला आठ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणात (sexual harassments of minor girl) वीस वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (maulvi 20 years jail).
2019 पासून न्यायालयीन कोठडीत: पीडित आठ वर्षीय विद्यार्थिनीची चुलत आईच्या तक्रारीवरून विनोबा भावे मार्ग पोलिस ठाण्यात मौलवीविरुद्ध 2019 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी मौलवीला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष POCSO लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 अंतर्गत न्यायालयाने 35 वर्षीय शिक्षक मौलवीला शिक्षा सुनावली आहे. पीडित मुलगी मे 2019 मध्ये उर्दू शिकण्यासाठी मौलानाकडे जात होती. पीडित मुलीने सर्वप्रथम आपल्या आईला तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली. पीडित मुलीने सांगितले की, शिक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच तिने विरोध केला असता तिला मारहाण देखील केली.
या प्रकरणात सरकारी वकील वीणा शेलार यांनी 10 साक्षीदार तपासले आणि सीसीटीव्ही फुटेजचाही वापर केला. आरोपीने मात्र आपल्याला या प्रकरणात खोटे फसवल्यात आले असून तो मौलवी नसून व्यवसायाने शिंपी असल्याचा दावा केला आहे. तथापि फिर्यादीने विविध सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांद्वारे हे सिद्ध केले की आरोपी क्लासेस चालवायचे आणि उर्दू शिकवायचे.