महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..हे असलं कारटं लोकसभेत जाऊ देवू नका - आव्हाड , ..होय, फडणवीसांनीच गोदावरीचे पाणी गुजरातला दिले - भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे १० पेक्षा जास्त खासदार निवडून आले तर शरद पवार देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या एका नेत्याने व्यक्त केला आहे... तर नवनीत राणा कौर यांच्या प्रचारादरम्यान काँग्रेसची अंतर्गत गटबाजी विकोपाला गेल्याने राणा यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले, यावेळी त्यांना रडू कोसळल्याचा प्रकार घडला आहे... तसेच गडचिरोलीत पहिल्या टप्प्यातील मतदान आज घेण्यात आहे... या सारख्या राजकीय घडामोडींचा थोडक्यात घेतलेला आढावा वाचा मतकंदनमध्ये..

मतकंदन महाराष्ट्राचे

By

Published : Apr 15, 2019, 10:11 AM IST

Updated : Apr 15, 2019, 1:44 PM IST

तर शरद पवार पंतप्रधान होतील..!
अकोला- राष्ट्रवादी काँग्रेसचे १० पेक्षा जास्त खासदार निवडून आले तर शरद पवार पंतप्रधान होतील, असे भाकीत राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांनी केले आहे. अकोला येथे आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.वाचा सविस्तर

खा.गांधींची प्रचाराला दांडी, सुजय विखेंना फटका बसणार का?

अहमदनगर - नगर दक्षिणचे युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ रविवारी एका प्रचार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची महाआरती करून या रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड, भारतीय जनता पक्षाचे अॅड. अभय आगरकर, सुवेंद्र गांधी यांच्यासह भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.वाचा सविस्तर

सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप गड राखणार का ?

सांगली - भाजपकडून गड राखला जाणार की? काँग्रेसच्या हातातून गेलेला गड स्वाभिमानी परत मिळवून देणार? की वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार याबाबत सांगलीत चर्चा रंगू लागल्या आहेत. ७० वर्षे काँग्रेस आणि ३५ वर्षे वसंतदादा पाटील यांच्या हातात सांगली लोकसभा मतदारसंघ राहिला आहे. मात्र, २०१४ मधील निवडणुकीत मोदी लाटेत सांगलीत काँग्रेस बालेकिल्याला सुरुंग लागला आणि भाजपच्या संजयकाका पाटील यांनी निर्विवाद विजय मिळवला. त्यावेळी काँग्रेसकडून प्रतीक पाटील यांनी कडवी झुंज दिली होती. राज्यातील सत्तेत असणारे दिग्गज नेते तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी या निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. मात्र, तरीही काँग्रेसचा गड कोणालाही शाबूत ठेवता आला नाही.वाचा सविस्तर

'राजकारणातून विखे परिवाराला हद्दपार करण्याची विरोधकांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत'

अहमदनगर - जिल्ह्यात अनेकजण विखे परिवाराच्या विरोधात असले तरी जनता आमच्या पाठीशी आहे. गेली ५० वर्षे विखे परिवाराने राजकारण आणि समाजकारण केले आहे. पुढील ५० वर्षे आम्हाला कोणी हटवू शकत नाही. आम्ही सामान्य गरीब समाज घटकांसोबत असल्याने आम्हाला राजकारणातून हद्दपार करणाऱ्यांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत, असा टोला डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांना लगावला.वाचा सविस्तर

औरंगाबाद मतदारसंघ : अब्दुल सत्तारांचा शिवसेनेच्या 'या' आमदाराला पाठिंबा

औरंगाबाद- निवडणुकीच्या प्रार्श्वभूमीवर काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे लोकसभा उमेदवार आणि शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.वाचा सविस्तर

होय फडणवीसांनीच गोदावरीचे पाणी गुजरातला दिले- भुजबळ

नांदेड - गुजरातचा पुळका असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने २० जुलै २०१७ रोजी गोदावरीचे पाणी गुजरातला देण्याचा निर्णय घेतला. हे सूर्य प्रकाशाइतके सत्य असताना आता ते चक्क खोटे बोलत आहेत. जरी भाजप सरकारने असा निर्णय घेतला असला तरी आम्ही मात्र एक थेंब पाणी गुजरातला देणार नाही, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.वाचा सविस्तर

हे असलं कारटं लोकसभेत जाऊ देवू नका - आव्हाड

अहमदनगर- ज्येष्ठांचा अपमान करणारे कारटं लोकसभेत जात कामा नये. राधाकृष्ण विखेंनी मुलाला ज्येष्ठांचा सन्मान करायला शिकवले का हाच प्रश्न आता उपस्थित होतो, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. ते अहमदनगर येथे आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारसभेत बोलत होते.वाचा सविस्तर

माढ्यात घासून नाही, ठासून येणार; दिपक साळुंखे पाटलांचा दावा-

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपने माढ्यात दबाव टाकून पक्षप्रवेश सुरू केला आहे, असा आरोप दीपक साळुंखे-पाटील यांनी केला आहे. मात्र, याचा कोणताही फायदा भाजपला मिळत नाही असे सध्याचे चित्र आहे. भाजपने कितीही जोर लावला तरी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे आता फक्त किती मताधिक्य मिळणार याची उत्सुकता असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वाचा सविस्तर

बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

मुंबई- बोरिवली स्टेशन परिसरात सोमवारी उत्तर मुंबई लोकसभेची काँग्रेसची प्रचार सुरू असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशा घोषणा देत हुल्लडबाजी केली. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'चौकीदार चोर हैं' चा नारा दिला. या वादातून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.वाचा सविस्तर

संभाजी पवारांची नाराजी दूर, संजयकाकांना पाठिंबा -


सांगली- एकेकाळचे भाजपचे सांगलीचे माजी आमदार व भाजपवर नाराज असलेल्या पैलवान संभाजी पवारांची नाराजी अखेर दूर करण्यात भाजपला यश आले आहे. रविवारी पै. संभाजी पवारांनी सांगली लोकसभेच्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने संभाजी पवार गहिवरून गेले होते. तर २१ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संभाजी पवार हे भाजपत कमबॅक करणार आहेत.वाचा सविस्तर

मुंडे समर्थक अॅड शेख रफिक यांचा राष्ट्रवादिला पाठिंबा-

बीड- जिल्ह्याच्या राजकारणाची समिकरणे दिवसेंदिवस बदलत आहेत. ५ दिवसांपूर्वी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, जयदत्त क्षीरसागर यांचे समर्थक आणि मुस्लीम समाजामधील मोठे प्रस्त असलेले अॅड. शेख शफिक यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.वाचा सविस्तर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी ही ठगबाजांची आघाडी - मुख्यमंत्री-

अमरावती - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी ही ठगबाजांची आघाडी आहे. हे पुन्हा एकदा देशाला ठगण्यासाठी एकत्र आले आहेत. देशाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची गरज आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी अडसुळांना पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. ते परतवाडा येथील जाहीर सभेत बोलत होते.वाचा सविस्तर

नांदेडमध्ये आज राहुल गांधींची जाहीर सभा-

नांदेड- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या टप्प्यात नांदेड मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी दिग्गज नेते नांदेडमध्ये हजेरी लावत आहेत. आज (सोमवार) काँग्रेसचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची सभा होणार आहे. तर युतीच्या उमेदवार चिखलीकरांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी मंगळवारी सभा घेणार आहेत. वाचा सविस्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज सोलापुरात धडाडणार-

सोलापूर - मोदी- शाह या जोडींच्या विरोधात रणशिंग फुकलेल्या राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. गुढीपाढव्याच्या सभेत मोदींचा खोटारडेपणा उघड पाडण्यासाठी पुराव्यासह केलेल्या त्यांच्या भाषणाने नागरिकांमध्ये त्यांच्या सभा बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सभांना प्रंचड गर्दी होत असल्याचे चित्र नांदेडात पाहायला मिळाले. त्यानंतर राज ठाकरेंची तोफ आज सोलापुरातील कर्निकनगर मैदानात धडाडणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे. सोलापूर मतदारसंघात तिरंगी आणि चुरशीची लढत असल्यानेही राज यांच्या सभेला फार महत्व आले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सभेला गर्दी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची-

नांदेड - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भोकर येथे शनिवारी सभा होती. त्यापूर्वी सभेला लोक जमविण्याच्या कारणावरून काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांत बाचाबाची झाली. व्यासपीठावरच हा सर्व प्रकार घडल्याने काही काळ गोंधळ उडाला होता.वाचा सविस्तर

'त्या' आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याप्रमाणे पवनराजे यांच्या हत्येप्रकरणी ओमराजेंना न्याय मिळावा - उद्धव ठाकरे

उस्मानाबाद- जिल्ह्यातील कसबे तडवळा येथील दिलीप ढवळे या शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला पलटवार केला आहे. ढवळे यांना जो न्याय मिळायला हवा तो न्याय पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी ओमराजेंना न्याय मिळावा, अशी त्यांनी मागणी केली. युतीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त घेण्यात आलेल्या शहरातील प्रचारसभेत ते बोलत होते. ढवळे व इतर शेतकऱ्यांची मातोश्री येथे भेट झाली नसल्याबद्दल ठाकरेंनी सभेत जाहीर माफीही मागितली.वाचा सविस्तर

मोदींची बारामतीतून माघार; त्यांच्याऐवजी शाह घेणार सभा?

मुंबई- मोदी यांची १७ तारखेला माढा मतदार संघात सभा होणार आहे. याच वेळी त्यांची बारामतीत भाजपच्या उमेदवार कांचन कुल याच्या प्रचारासाठीही सभा होणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण ही चर्चा मावळली असून शाह यांची सभा बारामतीत होणार असल्याची माहिती मिळत आहे.वाचा सविस्तर

Last Updated : Apr 15, 2019, 1:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details