मुंबई - माथाडी कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करा, त्यांना रेल्वेने, परिवहन सेवेच्या बस व एसटीने प्रवास करण्यास परवानगी द्या, या घटकाला विशेष विमा संरक्षण कवच लागू करा, या मागणीकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (दि. 10 मे) माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेटून घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतली - राज्यपाल बातमी
विविध मागण्यांसाठी माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने आज (दि.) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेटून घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
या शिष्टमंडळात माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या सोबत एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, पोपटराव देशमुख हे माथाडी नेते उपस्थित होते. पहिल्या व दुसऱ्या टप्यापासून माथाडी कामगार व अन्य घटक जीव मुठीत घेऊन नागरिकांच्या अन्न-धान्य, मसाले, कांदा, बटाटा, भाजीपाला, फळे व गॅस सिलिंडर या जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची तसेच खते, खाद्य मालाची चढ-उताराची कामे करत आहेत. त्यांच्या न्याय प्रश्नांची अनेक निवेदने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना सादर केली. लाक्षणीक संप केला. रेल्वे स्थानकासमोर महाराष्ट्र व कामगार दिनी माथाडी कामगार न्याय हक्क सप्ताह साजरा केला. पण, याची दखल घेतली गेली नाही म्हणून आज (दि. 10 मे) राज्यपालांची भेट घेऊन माथाडी कामगार व अन्य घटकांच्या प्रश्नांचे निवेदन सादर करण्यात आले.
हेही वाचा -५० लाख लस खरेदी करणार, मोफत लसीसाठी गळा काढणाऱ्यांनी सेंटरवर जावं- मुंबई महापौर