मुंबई : गेल्या सात-आठ वर्षांमध्ये युग शास्त्र आणि योग अभ्यास या संदर्भात अनेक पाचवे केंद्र सरकारने उचलली आहेत. कार्यक्रमदेखील घोषित केले आहेत. योग अभ्यासाला जागतिक पातळीवर नेण्याचे देखील ठरवले. त्यामुळे अनेक ठिकाणी शालेय ते उच्च शिक्षण सर्व ठिकाणी याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आता मुंबई विद्यापीठामध्ये मास्टर इन संस्कृत योगशास्त्र हा अभ्यासक्रम सुरू होत आहे.
मास्टर इन संस्कृत अभ्यासक्रम : नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील संस्कृत हा विषय सर्व जनतेमध्ये पोहोचवावा या अनुषंगाने अनेक पातळीवर शासन प्रयत्नशील आहे. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागामार्फत 2023- 24 या वर्षापासून मास्टर इन संस्कृत योगशास्त्र अभ्यासक्रम सुरू होत आहे. योगाकडे केवळ शारीरिक व्यायाम असे म्हणून दृष्टिकोन ठेवला जातो. मात्र, तो तेवढ्यापुरता न ठेवता त्याचा सुरेख आणि व्यापक विचार करायला पाहिजे या अनुषंगाने हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठांमध्ये सुरू होत आहे.
आंतरराष्ट्रीय परिसंवाद :मुंबई विद्यापीठांमध्ये योग सिद्धांत आणि योगाचे उपयोजन या महत्त्वाच्या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद देखील केला गेला होता. त्या परिसंवादा दरम्यान विद्यापीठाने या मास्टर इन संस्कृत संदर्भात घोषणा देखील केल्या आहेत. योगशास्त्राचे मूल सिद्धांत संस्कृत भाषेमध्ये विद्यार्थ्यांना शिकता येईल. आजच्या काळाच्या अनेक संदर्भात त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामध्ये योगसूत्र असतील, हट्टयोग असतील, पतंजली योगसूत्र असतील असे विविध प्रकारचे जुने ग्रंथ देखील अभ्यासले जातील.