महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fire at Prime Mall : विलेपार्ले येथील प्राईम मॉलला भीषण आग, एकावर उपचार सुरू

मॉलला भीषण आग
मॉलला भीषण आग

By

Published : Nov 19, 2021, 11:56 AM IST

Updated : Nov 19, 2021, 10:56 PM IST

11:51 November 19

विलेपार्ले येथील प्राईम मॉलला भीषण आग

आग लेव्हल ४ फायर घोषित

मुंबई -मुंबईमधील आगीचे सत्र सुरूच आहे. पवई येथील हुंडाई कंपनीच्या शोरूमला गुरुवारी आग लागली होती. (fire in mumbai hundai showroom) ही घटना ताजी असतानाच आज (शुक्रवारी) सकाळी विलेपार्ले येथील प्राईम मॉलला भीषण आग लागली. या आगीवर सुमारे दोन तासांनी सर्व बाजूने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, या आगीत दोन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. (bmc department of emergency management)

मॉलमध्ये भीषण आग -

मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले इर्ला नाला येथे प्राईम मॉल आहे. तळ अधिक तीन मजले, असे एकूण चार मजल्यांचा हा मॉल आहे. या मॉलमधील पहिल्या मजल्यावर आज सकाळी ११.३० च्या सुमारास आग लागली. या आगीने भीषण रूप धारण केल्याने मुंबई अग्निशमन दलाच्या १३ फायर इंजिन, ८ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल दोन तास या आगीशी झुंज देत त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर दुपारी १.२०च्या दरम्यान आगीवर सर्व बाजूने नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

सदर आग अग्निशमन दलाच्या नियंत्रणात असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या आगीत एक व्यक्ती तसेच एक अग्निशमन दलाचा जवान जखमी झाला आहे. ही आग का लागली याची चौकशी अग्निशमन दलाकडून केली जात असून त्याचा अहवाल आल्यावर आगीची नेमके कारण समोर येईल, असे सांगण्यात आले आहे. 

दोन जण जखमी, एक गंभीर -

मॉलला लागलेल्या आगीच्या घटनेत धुरामुळे गुदमरल्याने एका व्यक्तीला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुबासिर मोहम्मद के असे या व्यक्तीचे नाव आहे. तो २० वर्षांचा आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कूपर रुग्णालयाच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा यांनी दिली. तर आग विझवताना मंगेश गांवकर हे अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत. ते ५४ वर्षाचे असुन त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

Last Updated : Nov 19, 2021, 10:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details