मुंबई -सीमेवर लढणाऱ्या जवानांचा हुतात्मा होण्याचा आकडा वाढल्यावरच समाजाला राग येईल का? असा सवाल हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे यांनी केला. लालबागचा राजा मंडळाच्या वतीने हुतात्मा जवानांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
हुतात्म्यांचा आकडा वाढल्यावरच राग येणार का? - वीरपत्नी - हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे
जवानांचा मान ठेवायला शिका. सोशल मीडियावर व्यक्त होत असताना समाजाने भान राखले पाहिजे. तसेच सर्वांनी जवानांचा मान ठेवायला पाहिजे असे त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी पुलवामा हल्ल्यातील बुलडाणा येथील दोन्ही हुतात्मा जवानांच्या वीरपत्नी व ६ महिन्यांपूर्वी काश्मीर येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे यांना सन्मानचिन्ह व ५ लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे