मुंबई :प्रमुख इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरले आणि इतर आशियाई इक्विटींचे दर सुध्दा कमी (Markets fall in early trade amid weak Asian equities) दिसुन आले. या काळात बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स ४६३.१ अंकांनी घसरून, ६१,२००.३८ वर आला. एनएसईचा निफ्टी 129.25 अंकांनी घसरून 18,178.40 वर होता. Share Market Update
बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, एचडीएफसी, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि नेस्ले या कंपण्यांचे शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसरीकडे, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल, मारुती, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि टाटा स्टील यांचे शेअर्स वधारले. इतर आशियाई बाजारांमध्ये, सोल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँग या देशांचे मार्केट घसरले. शेअर बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) शुक्रवारी निव्वळ आधारावर 751.20 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.