मुंबई :"मुलांना जे आवडते त्या भाषेत मुलांना शिक्षण दिले गेले पाहिजे तसेच महाराष्ट्रातील प्रत्येकाने मराठी भाषेला प्राधान्य द्यायला सुरुवात केली पाहिजे", असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते बालभारती चित्रपटाच्या ट्रेलरचे (Marathi film Balbharati trailor launch ) अनावरण करण्यात आले.
इंग्रजी भाषा ही सर्वस्व नाही -शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर म्हणाले की, "जरी तुम्हाला इंग्रजी येणे गरजेचे असेल तरी इंग्रजी हे सर्वस्व नाही. मुलांना जे आवडते त्या भाषेत मुलांना शिक्षण दिले गेले पाहिजे. आज जे देश तंत्रज्ञानात विकसित आहेत, त्यांनी त्यांच्या मातृभाषेत शिक्षण दिल्याचे दिसून येते. फ्रान्स विमान तंत्रज्ञानात पुढे आहे, पण ते फ्रेंच भाषेत बोलतात. मी पॅरिसमध्ये असताना रस्त्यावर मला कुणीही इंग्रजीत उत्तर दिले नाही. कदाचित त्यांना इंग्रजी येत असेल पण त्यांना त्यांच्याच भाषेचा आग्रह धरवासा वाटत असेल. आपल्याला इंग्रजी आली पाहिजे, पण इंग्रजी हे काही सर्वस्व नसल्याचे ते म्हणाले.