मुंबई -वरळीत भाजपच्या वतीने दिवाळीच्या ( Diwali Festival ) पार्श्वभूमीवर मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन ( Organization of Marathmola Dipotsav program ) केले आहे. आगामी मनपा निवडणुकीत भाजपचा ( Organized Deepotsav program on behalf of BJP ) मराठी मतांवर डोळा आहे. मात्र, याच मराठी माणसातील कलाकाराचा भाजपच्या आमदाराने भर कार्यक्रमात उत्तर भाषिक अभिनेत्यासाठी घोर अपमान केला. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते सचिन अहिर ( Shiv Sena leader Sachin Ahir ) यांनीही ट्विटवरुन भाजपवर जोरदार टीकास्त्र ( Sachin Ahir criticizes BJP ) सोडले. तसेच हाच का मराठी कलाकारांचा सन्मान, असा थेट सवालही विचारला.
मराठमोळा दीपोत्सवाचे आयोजन-मुंबई मनपात सत्ता आणण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. राज्यात ठिकठिकाणी मराठमोळा दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. बुधवारी वरळीच्या जांबोरी मैदानावर भाजपच्या मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी संगीतोत्सवाच्या कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक राहुल देशपांडे यांचा ही कार्यक्रम या ठिकाणी होणार होता. परंतु, राहुल देशपांडे यांचे गायन सुरु असतानाच बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आल्याने त्यांना कार्यक्रम थोडा वेळ थांबवण्यास सांगितले.