मुंबई - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात विविध ठिकाणी मोठ-मोठे मोर्चे निघाले. त्यात ४२ तरुणांनी आरक्षण लवकर मिळावे, या मागणीसाठी आत्महत्या केली. या आत्महत्या केलेल्या कुटुंबांना सरकारने प्रत्येकी १० लाख रूपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीचे आश्वासन दिले होते, परंतु आत्तापर्यंत केवळ ५ कुटुंबालाच प्रत्येकी ५ लाख प्रमाणे मदत दिली असून, नोकरीसाठी खेटे मारूनही ती दिली जात नसल्याची खंत शिवसंग्रामचे नेते व विधापरिषदेचे आमदार विनायक मेटे यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केली.
आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांचे कुटुंब मदतीपासून दूर; मेटे यांनी मांडली खंत - morcha
मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले त्यात ४२ तरुणांचा समावेश होता, त्यात बीड जिल्ह्यातील १० होते, या तरुणाच्या कुटुंबातील व्यक्तीला १० लाख आणि नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, त्यापैकी केवळ ५ लोकांना ५ लाख प्रमाणात मदत दिली असून इतरांना ती मदत मिळाली नाही ती द्यावी, अशी मागणी मेटे यांनी सभागृहात करत सरकारच्या अनास्थेबाबत खंतही व्यक्त केली.
आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांचे कुटुंब मदतीपासून दूर
मेटे यांनी औचित्याच्या माध्यमातून हा विषय सभागृहात मांडला. मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले त्यात ४२ तरुणांचा समावेश होता, त्यात बीड जिल्ह्यातील १० होते, या तरुणाच्या कुटुंबातील व्यक्तीला १० लाख आणि नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, त्यापैकी केवळ ५ लोकांना ५ लाख प्रमाणात मदत दिली असून इतरांना ती मदत मिळाली नाही ती द्यावी, अशी मागणी मेटे यांनी सभागृहात करत सरकारच्या अनास्थेबाबत खंतही व्यक्त केली.