मुंबई- वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आझाद मैदानावर मागील 10 दिवसांपासून सुरु आहे. या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशाचा अद्याप तिढा सुटलेला नाही. यामुळे सरकारवर आता विश्वास उरला नाही, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
सरकारवर विश्वास उरला नाही; मराठा विद्यार्थ्यांच्या भावना
आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत फक्त चर्चा करण्यात आली. ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आम्हाला आश्वासन देण्यात आले. या सरकारवर किती विश्वास ठेवायचा. यावर आम्हाला विचार करावा लागेल, असे विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले.
आम्हाला फक्त आश्वासन नको, ठाम निर्णय हवा आहे. आम्हाला हक्काची सीट मिळत नाही, तोपर्यत आंदोलन पाठीमागे घेणार नाही. आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत फक्त चर्चा करण्यात आली. ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आम्हाला आश्वासन देण्यात आले. या सरकारवर किती विश्वास ठेवायचा. यावर आम्हाला विचार करावा लागेल, असे विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले. येथे आम्हाला प्रवेश न मिळाल्यास आमचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांच्या आजच्या बैठकीत देखील काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे आमचे आंदोलन सुरूच राहील. आम्हाला ज्या कॉलेजमध्ये सीट मिळाली होती तीच कायम राहावी, अशी आमची मागणी आहे. तसेच आम्हाला सरकारकडून लेखी स्वरूपात हमी हवी असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सरकार आमच्या मागण्यांवर गंभीर दिसत नसल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला.