मुंबईMaratha Reservation issue: जालना येथील आंदोलकांवरील लाठीचार्जबाबत औरंगाबाद परिक्षेत्राचे आयजीपी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आयजीपी ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले, उपोषणाला बसलेल्या मनोज जरंगे यांची प्रकृती ढासळू लागली होती. अतिरिक्त एसपी आणि एसडीएम यांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी त्यांना समजाविलं होते. त्यावेळी तेथे उपस्थित जमावाने दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत एकूण 21 महिला अधिकारी आणि 43 जवान जखमी झाले आहेत. तर एकूण 64 अधिकारी जखमी झाले आहेत.
Maratha Reservation issue: गिरीश महाजनांसह नितेश राणे उपोषणस्थळी दाखल, आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू
Maratha Reservation issueजालना येथील आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जनंतर राज्यातील राजकारण तापलयं. पोलिसांच्या अमानुष लाठीचार्जवरून विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून पोलीस व सत्ताधारी नेत्यांवर टीका होतय. दुसरीकडं विविध जिल्ह्यांत मराठा समाजाचे आंदोलक आंदोलन करत आहेत.
Maratha Reservation issue
Published : Sep 3, 2023, 4:26 PM IST
|Updated : Sep 3, 2023, 7:41 PM IST
Live Updates-
- आमदार मंगेश चव्हाण, मंत्री गिरीश महाजन व नितेश राणे हे आंदोलनाच्या घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी सरकारचा प्रस्ताव दिला आहे. विषय मार्गी लावू, असे त्यांनी आश्वासन दिले आहे. मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सत्ताधारी नेते प्रयत्न करत आहेत. यापूर्वीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी फोनवरून संवाद साधला. त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. अंतरवालीमधील आंदोलन आज संपणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे.
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे हे उद्या दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट देणार आहेत.
- जालन्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातील पुणे एसआरपी बटालियनचे समादेशक शैलेश बलकवडे यांच्याकडे आला. फडणवीस यांच्या वरदहस्तामुळे बलकवडे यांनी कोल्हापूरचे जिल्हा पोलीसप्रमुखपद साडेतीन वर्षे भूषविले होते.
- हिंसक झालेला जमाव पाहून त्यांना पांगवण्यासाठी आम्हाला बळाचा वापर करावा लागला. आक्रमक झालेल्या 40 आंदोलकांना अटक करण्यात आलीय. आंदोलकांनी बस जाळल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त फौज तैनात करण्यात आलीय. आम्ही दक्ष आहोत, असे औरंगाबाद परिक्षेत्राचे आयजीपी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी म्हटलंय. ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, जालन्यात काय घडलं, हे सर्वांनीच पाहिलय. लाठीचार्ज अत्यंत अमानुषपणे करण्यात आलाय. शत्रुवर हल्ला केल्याप्रमाणं लाठीचार्ज करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांना न सांगता लाठीचार्ज होणे शक्य नाही. राज्य सरकारला थोडीही लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.
- जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आजबुलढाण्यात रास्ता रोकोआंदोलन करणार होते. त्यापूर्वीच बुलढाणा शहर पोलिसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना रोखले. शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस यांना सकाळी घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेत्यांसह जवळपास 30 ते 40 जणांना ताब्यात घेतले. Jalna Lathi Charge
- मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्रालयावर टीका होत असतानाच पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. हिंसक वळण लागल्यानं लाठीचार्ज करावा लागला, असं पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलय.
- मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मारहाण करणाऱ्या सगळ्याच पोलिसांना बडतर्फ करावे, अशी राज्य सरकारकडं मागणी केलीय. एका ओळीचा आरक्षणाचा जीआर काढून राज्य सरकारनं विषय संपवावा, असेही जरांगे यांनी म्हटलय.
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आज पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरे यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही आंदोलकांची भेट घेऊन अमानुष अत्याचारावरून राज्य सरकारवर टीका केलीय.
हेही वाचा-
- SP Tushar Doshi on compulsory leave: लाठीचार्ज प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर मोठी कारवाई, आंदोलक मनोज जरांगे यांनी 'ही' केली मागणी
- Jalna Maratha Protest : राज ठाकरेंचा मराठा आंदोलनाला पाठिंबा, हा अमानूष अत्याचार - मनसे
- Maratha Protest Against Lathicharge : मराठा समाज आक्रमक; आंदोलनापूर्वीच बुलढाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड
Last Updated : Sep 3, 2023, 7:41 PM IST