मुंबई Maratha Reservation :राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असतानाच सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची सुरू आहे. काल मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. अशा स्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाच्या प्रचारासाठी रायपूरला गेले होते. त्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्यावर टीका केली. त्यावर भाजपाच्या प्रादेशिक ट्विटर अकाऊंटवरून या ट्विटला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंचा आरोप :मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून आता या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आहे. दरम्यान, राज्यात अनेक अप्रिय घटना घडत असून गृहमंत्रालयाला जाणीव नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाच्या विधानसभा प्रचारासाठी रायपूरला होते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार डेंग्यूने त्रस्त असल्यानं काल झालेल्या मराठा आरक्षणावरील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. भाजपाच्या प्रचारामुळंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अशा परिस्थितीत रायपूरला गेल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या आरोपाला भाजपानं त्यांच्या प्रादेशिक ट्विटर X हँडलवरून प्रत्युत्तर दिलं आहे.