अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा अथवा विरोध नाही
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा अथवा विरोध नाही. असे आज अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सांगण्यात आले आहे.
पुरुषोत्तम किर्दत, सदस्य मराठा महासंघ
मुंबई -अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा अथवा विरोध नाही. असे आज अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी जर मराठा महासंघाच्या पत्रकाद्वारे एखाद्या पक्षाचा पाठिंबा दिला, तर त्याला पदावरून काढण्यात येईल, असे महासंघाच्यावतीने सांगण्यात आले आहे.