मुंबई -मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे प्रलंबित मागण्यासाठी आज मराठा समाज मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार होता. मात्र, या ठिकाणी मोर्चाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी मोर्चा मध्येच अडवला. पोलीस व मराठा नेते यांच्यात काही वेळ चर्चा झाल्यावर पोलिसांनी मराठा ठोक क्रांती मोर्चाचे शिष्ट मंडळ मंत्रालयात जाईल. तर बाकीच्या कार्यकर्त्यांना आझाद मैदानात बसण्यास सांगितले.
सीएसटीवरून मंत्रालयापर्यंत हा मोर्चा निघणार होता. त्यामुळे आता मंत्रालयात मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा होते. मराठा समाजाच्या मागण्यांवर काय तोडगा निघणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काय आहेत मागण्या -
- आंदोलन काळातील सरसकट सर्व गुन्हे मागे घ्यावे.
- 2014 च्या विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात.
- 72 हजार मेगा भरतीतील विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्या.
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्या.
- सारथी प्रशिक्षण संस्थेतर्फे मराठ्यांसाठी समिती द्यावी
- अण्णासाहेब पाटील महामंडळच्या सुलभ कर्ज योजना तत्काळ करा.
- शेतकऱ्यांना पीकविमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा.
हे होणार मोर्चात सहभागी -
- 2014 पासूनचे सर्व विभागातील विद्यार्थी
- 72 हजार मेघा भर्तीतील विद्यार्थी
- स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी
- महावितरण, आरोग्यविभाग, महसूल विभाग, वन विभाग, वित्त विभाग, जिल्हा परिषद, ग्रामविकास, शिक्षक भरतीतील सर्व विद्यार्थी