मुंबई - मराठा क्रांती मोर्चाने कुठल्याही पक्षाला जाहीर पाठिंबा दिलेला नाही. काही स्वयंसेवक काही पक्षासोबत हातमिळवणी करुन पाठिंबा दिल्याचे भासवत असतील. मात्र, त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी आज(शनिवारी) केले आहे.
सरकार मराठा आरक्षणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करत नाही. शिवस्मारक आणि कोपर्डी प्रकरणी सत्ताधारी पक्ष उदासिन होता. त्यामुळे, मराठा समाजाने योग्य निर्णय घ्यावा. स्थानिक पातळीवर जो उमेदवार योग्य आहे त्यालाच मतदान करण्यात येईल, अशी माहिती आबासाहेब पाटील यांनी दिली.