मुंबई- आज दादर येथील शिवाजी मंदिर याठिकाणी मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या मुलांना या वर्षी आरक्षण नाकारल्याचा महत्वाचा मुद्दा या चर्चेत होता. जो पर्यंत मराठा समाजातील या मुलांना प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच राहील तसेच राज्यभर आंदोलन केले जाईल, असा निर्णय या चर्चेत घेण्यात आला.
..अन्यथा राज्यभरातून मराठा समाज मुंबईत आंदोलनास येईल, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
आज दादर येथील शिवाजी मंदिर याठिकाणी मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या मुलांना या वर्षी आरक्षण नाकारल्याचा महत्वाचा मुद्दा या चर्चेत होता.
मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या भेटीत प्रवेश फी सरकार भरणार असल्याचे सांगितले. मात्र, मराठा समाजातील मुलांना वैद्यकीय क्षेत्रात जेथे प्रवेश मिळाला आहे, तेथेच प्रवेश द्यावा ही मागणी आहे आणि हाच मुद्दा आज राज्यस्तरीय बैठकीत चर्चेत होता. विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याने त्यांचे वर्ष वाया जाऊ शकते. त्यामुळे आजच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाने सरकारला मागील २ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. विद्यार्थ्यांच्या जागेचा (Seats) चा प्रश्न जर सोडवला नाहीतर मराठा समाजाने आक्रमक होऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपल्यावर सर्व समन्वयक आझाद मैदानात आंदोलनासाठी जाणार आहेत. तसेच संपुर्ण महाराष्ट्रातून देखील मराठा समाज या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत येणार आहे. आता येथून पुढे मुख्यमंत्र्यांची भेट आम्ही घेणार नाही. विद्यार्थ्यांकडे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. जर शासनाने निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे. त्यामुळे शासनाने आजच्या आज निर्णय घेतला पाहीजे, अशी मागणी देखील या बैठकीत करण्यात आली.