महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकारण असते, त्यात एकमेकांवर खरे -खोटे बोलून मात केली जाते; राणेंच्या आत्मचरित्रावर मनोहर जोशींची प्रतिक्रिया - राजकारण

त्यावेळी सुभाष देसाई यांना विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी मनोहर जोशी यांनीच कटकारस्थान करत नारायण राणे यांना डावलल्याचा आशय या आत्मचरित्रात आहे.

मनोहर जोशी

By

Published : May 8, 2019, 7:26 PM IST

मुंबई- स्वाभिमानी पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांच्या इंग्रजी भाषेतल्या 'नो होल्ड्स बार' आत्मचरित्रातल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. मात्र, या आरोपांबाबत बोलताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी राजकारणात एकमेकांवर खरे-खोटे बोलून मात केली जाते त्यासाठी काही गोष्टी घडतात. मात्र, त्या सर्वच घटना सत्य असतात असे नव्हे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच नारायण राणे माझे जवळचे मित्र होते, त्यांनी असे आरोप केले याचे मला आश्चर्य वाटते असेही ते म्हणाले.

मनोहर जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांच्याशी केलेली बातचीत

त्यावेळी सुभाष देसाई यांना विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी मनोहर जोशी यांनीच कटकारस्थान करत नारायण राणे यांना डावलल्याचा आशय या आत्मचरित्रात आहे.

राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्यावर शरसंधान केले आहे. यावर जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांच्याशी बातचीत केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details