मुंबई - काश्मिरात शांतता नांदवू व राममंदिर अयोध्येत उभारू असे, आश्वासन देत भाजप २०१४ मध्ये सत्तेत आली. जनता सुज्ञ असून तिला फार काळ मूर्ख बनवता येत नाही. जनतेच्या मनातही प्रश्न असतात व मतपेटीद्वारे ती त्या प्रश्नांची उत्तरे शोधत असते. 23 मेला जनतेची ‘मन की बात’ समोर येईल, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपला चिमटा काढला आहे. आता जनता प्रश्न विचारणार, तेव्हा त्याची उत्तरे देण्याची तयारी भाजपने ठेवायला हवी, असेही यात म्हटले आहे.
23 मेला जनतेची 'मन की बात’ समोर येईल ; शिवसेनेची मोदींवर अप्रत्यक्ष टीका - yuti
गरीब जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येत असल्याची घोषणा करत या पक्षांनी 'संधीसाधु' युती केली. 'सामना'च्या अग्रलेखातून नेहमी भाजपवर टिकेची छोड उडवणाऱ्या शिवसेनेने आज अप्रत्यक्ष टीका केली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात ही भूमिका पंतप्रधान सातत्याने मांडत होते. मोदी यांची भूमिका चुकीची नव्हती, पण या महाकाय देशात ते शक्य आहे काय? त्यामुळे एकत्र निवडणुका या भूमिकेवर अधिक जोर देऊन काम करावे लागेल. देशात सतत कोठे ना कोठे कुठल्या ना कुठल्या निवडणुका सुरूच असतात व त्याचे ओझे प्रशासन व राष्ट्रीय तिजोरीस वाहावे लागते, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले. तसेच, फक्त भारतातच ‘ईव्हीएम’चा हट्ट का? हा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
मागील ४ वर्ष परस्परांवर टोकाची टीका करणाऱ्या शिवसेना आणि भाजपची अखेर फेब्रुवारीत युती झाली. गरीब जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येत असल्याची घोषणा करत या पक्षांनी 'संधीसाधु' युती केली. 'सामना'च्या अग्रलेखातून नेहमी भाजपवर टिकेची छोड उडवणाऱ्या शिवसेनेने आज अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यामुळे युतीत अजुनही सर्व काही मंगल नसल्याचे दिसून येतर आहे. निवडणुकीच्यावेळी शिवसेनेसारखा सहकारी गमावणे भाजपला परवडणारे ठरले नसते. म्हणूनच भाजपने तडजोड केली आणि एकटे निवडणूक लढवली तर सेनेला मोठा फटका सहन करावा लागणार होता. म्हणून नको असतानाही हे 'पक्ष युती २.०' च्या बंधनात अडकले. अजुनही शिवसेनेचे पक्षनेते पंतप्रधानांच्या कामाचे कौतुक करताना दिसत नाही. आता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे दोन्ही पक्ष कोणत्या मुद्द्यांवर बोलणार, कोण कोणाची पाठ थोपटणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.