मुंबई :आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे.आंबा हे सर्वांच्या आवडीचे फळ आहे.लालबाग परळ परिसरातून मोठ्या प्रमाणावर कोकणात जाण्यासाठी खासगी बसेस सुटतात. या खासगी बसेसमधूनच त्या विक्रेत्यांच्या आंब्याच्या पेट्या कोकणातून मुंबईत येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आंब्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तसेच या आंब्यांना पसंती देखील आहे. लालबागमधील मोरे यांच्या आंब्याच्या दुकानातून दररोज 40 ते 50 पेट्या विक्री होत असल्याची माहिती विजय यांनी दिली. फळाच्या आकाराप्रमाणे रत्नागिरी हापूस आंबा सहाशे, सातशे, आठशे तर देवगडचा हापूस आंबा सातशे, आठशे, नऊशे, एक हजार प्रति डझन अशा दराने विक्रीसाठी आहे.
हापूस आंबा मुंबईत आयात : 22 जूनपर्यंत लालबागच्या गणेश टॉकीज येथे आंबे उपलब्ध असतात, अशी माहिती आंबे विक्रेता अबू सालम यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. कोकणपट्ट्यातून अनेक ट्रॅव्हल्सच्या खासगी बसेस रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा मुंबईत आयात करतात. कोकणातील अनेक हापूस आंब्याचे बागायतदार मुंबईत आंबा पाठवतात. मग त्यांची मुंबईत विक्री केली जाते. पाच डझन हापूस आंब्याची पेटी तीन ते साडेतीन हजार रुपयांना उपलब्ध आहे.