मुंबई : छत्रपती शिवरायांवरील राज्यपालांचे वादग्रस्त विधाना प्रकरणी तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असतानाच भाजप नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. विरोधी पक्षाने यावर आक्षेप नोंदवत टीकेची झोड उठवल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही केली नाही, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यात या विधानाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. (Mangal Prabhat Lodha statement about MVA).
Mangal Prabhat Lodha : शिवरायांशी तुलना केलीच नाही ; मंगलप्रभात लोंढांची सारवासारव
प्रतापगडावर ३६४ वा शिवप्रतापदिनाचा कार्यक्रमात पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी महाविकास आघाडीची तुलना औरंगजेबाशी (Comparison of MVA with Aurangzeb) तर शिंदेंच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली होती. राज्यात विरोध होऊ लागल्यानंतर मंत्री लोढा यांनी यावर खुलासा केला. (Mangal Prabhat Lodha statement about MVA).
मी फक्त उदाहरण दिले : प्रतापगडावर ३६४ वा शिवप्रतापदिनाचा कार्यक्रमात पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाविकास आघाडीची तुलना औरंगजेबाशी तर शिंदेंच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली होती. राज्यपालांचा वाद ताजा असतानाच भाजपच्या नेत्याने पुन्हा एकदा शिवाजी महाराजांबाबत विधान केल्याने विरोधकांनी लोंढावर जोरदार आसूड ओढायला सुरुवात केली. राज्यात विरोध होऊ लागल्यानंतर मंत्री लोढा यांनी यावर खुलासा केला. ते म्हणाले की, माझं वक्तव्य कुणी पाहिले की नाही माहित नाही. मी शिवाजी महाराज यांची कुणाशी तुलना केली नाही. मी फक्त उदाहरण दिले होते. शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. शिवाजी महाराज सूर्य आहेत, असे ते म्हणाले.
हा राजकारणाच विषय नाही : लोढा पुढे म्हणाले की, हा राजकारणाच विषय नाही. मात्र सध्याचं राजकारण वेगळं आहे. राजकीय स्वार्थासाठी त्यांचा वापर करणे चुकीचे आहे. कृपया यावर कुणी राजकारण करू नये. मी कधीच असे राजकारण करत नाही. मला माझ्या विभागात काम करायचे आहे. राज्यात अनेक समस्या आहेत. लोकांसाठी चांगलं काम करण्याची माझी इच्छा आहे. मला काम करू द्या, असे आवाहन लोढा यांनी यावेळी केले.