मुंबई - आजकाल तरुण वयातदेखील केस गळणे आणि टक्कल पडणे ही समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. त्यावरहेअर ट्रान्सप्लांट हाएक उपाय आहे. मात्र,या शस्त्रक्रियेनंतर ५० तासांनीएका पुरुषाचेहृदय बंद पडून त्याचामृत्यूझाल्याची धक्कादायक घटना पवई परिसरात घडली आहे.
शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आला नसूनडॉक्टरांनीऔषधांच्या दुष्परिणामांमुळेमृत्यूझाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
व्यावसायिकअसलेले श्रवनकुमार चौधरी (वय ४३) यांनी गुरुवारी चिंचपोकळी येथील एका खासगीरुग्णालयात केस उगवण्याची ५ लाखाचीशस्त्रक्रिया केली होती. गुरुवारी तब्बल १५ तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान चौधरी यांच्या घरातील कुटुंबीय त्यांच्यासोबत नव्हते. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
व्यावसायिकअसलेल्या चौधरी यांनी गुरुवारी चिंचपोकळी येथील एका खासगीरुग्णालयात केस येण्यासाठी ५ लाखांचीशस्त्रक्रिया केली होती. मात्र,त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला म्हणून ते पवईतील हिरानंदानी रुग्णालयातीलडॉक्टरांनाभेटले. त्यांच्या चेहरा आणि गळ्यावर सूज आली होती. ते पाहून डॉक्टरांना ही एनाफिलॅक्सिस नावाची एक प्रकारची अॅलर्जी असल्याचा संशय आला.
ही अॅलर्जी प्रतिजैविक असलेल्या औषधांमुळे उद्भवली असावी असा निष्कर्ष डॉक्टरांनीकाढला. त्यामुळे चौधरी यांना त्वरित दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी चौधरी यांच्या हृदयाच्या तपासणीसाठीकार्डियोलॉजिस्टलाही बोलवण्यात आले होते.मात्र,त्याआधीचशनिवारी सकाळी पाऊणेसात वाजताच्या सुमारासत्यांचा मृत्यू झाला.
चौधरी यांच्यावर ९ हजार ५०० केसांचे पुनर्रोपण करण्यात आले होते. गुरुवारी तब्बल १५ तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान चौधरी यांच्या घरातील कुटुंबीय त्यांच्या सोबत नव्हते. अशा शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाला प्रतिजैविक आणि सलाईन दिले जाते. त्यामुळे कधीकधी अशा प्रकारची अॅलर्जी येऊ शकते. सलाईन लावताना ते हातावर न लावता केसांजवळील भागात लावले जाते. त्यामुळे जर रुग्ण पोटावर झोपला असेल तर सलाईनचे द्रव्य चेहऱ्याच्या दिशेने प्रवाहित होते आणि चेहरा सुजतो. पण त्यामुळे कधीही मृत्यू होत नाही,असे पुनर्रोपण तज्ज्ञांचे मतआहे.
चौधरी यांना प्रतिजैविकांच्या अॅलर्जीमुळेमृत्यू आला असल्याचाडॉक्टरांचाअंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र,या प्रकारामुळे चौधरी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबात त्यांची पत्नी आणि ३ मुले (१२ ते १८ वयोगटातील ) आहेत. साकीनाका पोलीस याप्रकरणी चिंचपोकळी येथील केशरोपण केलेले रुग्णालय मान्यताप्राप्त आहे का,की बेकायदशीर आहे? याबाबत चौकशी करणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त झोन 10 नवीनचंद्र रेड्डी म्हणाले.