मुंबई- विक्रोळी पार्क साईट येथील कैलास कॉम्प्लेक्स ९० फूट रोड जवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. सुरेश डबरे (40) असे त्या मृत युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती होताच परिसरात एकच खळबळ उडाली.
विक्रोळीत पार्किंगमधल्या कारमध्ये आढळला युवकाचा मृतदेह - युवकाचा मृतदेह आढळून आला
विक्रोळी पार्क साईट येथील कैलास कॉम्प्लेक्स ९० फूट रोड जवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. सुरेश डबरे (40) असे त्या मृत युवकाचे नाव आहे.
पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एम.एच-४५ ८२६३ कारमधून दुर्गंधी येत असल्याने आसपासच्या लोकांना शंका आली. त्यामुळे त्यांनी पार्क साईट पोलिसांना या बाबतीत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ धाव घेऊन कारची तपासणी केली. त्यावेळी त्यांना कारमध्ये युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याचा मृतदेह पुढील तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
सुरेशने आज सकाळी १० च्या दरम्यान गाडीतील वातानुकूलीत यंत्रणा चालू करून झोपल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुरेश हा पार्कसाईट येथील रहिवासी आहे. ही गाडी त्याचीच असून तो दोन दिवसांपासून घरी आला नसल्याचेही प्राथमिक माहितीत समोर आले आहे. ही गाडी ज्या ठिकाणी पार्क करण्यात आली होती, त्याच ठिकाणी नुकताच एक टँकर अपघातही झाला होता.