मुंबई - सिनेमात काम देतो असे सांगून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या एका आरोपीला सायबर सेलने अटक केली आहे. अटकेत करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अपूर्व अश्विन दौंड उर्फ ऋषी श्रॉफ असे आहे. 47 वर्षाच्या या आरोपीने अनेकांना लाखों रुपयाला गंडवले आहे. तुमच्या लहान मुलांना सिनेमात जाहिरातीमध्ये काम देतो, असे सांगून अनेकांकडून या आरोपींना लाखो रुपये उकळले आहेत.
सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपूर्व याने महेश गुप्ता यांना 32 लाख 69 हजार रुपयांचा गंडा घातला होता. महेश गुप्ता एअर स्पेअर पार्टचा व्यवसाय करतात. त्यांनी अपूर्व विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून सायबर सेल अपूर्वचा शोध घेत होते. अपूर्व विरोधात मुंबईच्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंद आहेत. साकीनाका ओशिवारा, अंबोली एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशन, दादर, पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये अपूर्व विरोधात अनेक तक्रारी नोंद आहेत. डीसीपी रश्मी करंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जारा वर्ल्ड आणि जारा किड्स या नावाच्या दोन वेबसाइट चालवत होता. या वेबसाइटच्या माध्यमातून तो अनेकांशी संपर्क करत होता. तसेच तो अनेकांना बल्कमध्ये मेसेज देखील पाठवत होता.