महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालेगाव बॉम्बस्फोट : साक्षीदारांची यादी मिळावी, कर्नल पुरोहित यांची उच्च न्यायालयात याचिका

2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साक्षीदारांची नावे, पत्ते, व जबानींची यादी 'एनआयए' या तपास यंत्रणेकडून मिळावी, म्हणून मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

मुंबई उच्च् न्यायालय

By

Published : Jul 22, 2019, 2:43 PM IST

मुंबई - 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साक्षीदारांची नावे, पत्ते, व जबानींची यादी 'एनआयए' या तपास यंत्रणेकडून मिळावी, म्हणून मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या संदर्भात एनआयए कोर्टाला मुंबई उच्च न्यायालयाने विचारणा केली असता, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयाकडून सूचना घेणे जरुरी आहे. आणि यासाठी एक आठवड्याचा वेळ द्यावा, अशी विनंती एनआयएच्या कोर्टाला विनंती केली. यावर मुंबई उच्च न्यायालयाने २ ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी घेतली जाईल असे स्पष्ट केले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट : साक्षीदारांची यादी मिळावी, कर्नल पुरोहित यांची उच्च न्यायालयात याचिका

कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या याचिकेवर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या लक्षात आणून दिले की, गेले दहा दिवस विशेष न्यायालयात या संदर्भात कुठलीही सुनावणी झाली नाही. तर याचिकेमुळे वेळ वाया जात आहे. यावर २ ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी होईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details