महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञा सिंगची दुचाकी साक्षीदारांनी ओळखली

मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात आज (सोमवार) विशेष न्यायालयात पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतलेल्या २ दुचाकी व ५ सायकली सादर करण्यात आल्या. यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग हिच्या नावावर असलेली दुचाकीही होती.

साध्वी प्रज्ञासिंग

By

Published : Jul 8, 2019, 7:50 PM IST

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात आज (सोमवार) विशेष न्यायालयात पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतलेल्या २ दुचाकी व ५ सायकली सादर करण्यात आल्या. न्यायालयाच्या आवारात ठेवण्यात आलेल्या या वस्तूंचे न्यायाधीश विनोद पडाळकर आणि साक्षीदारांनी खाली येवून पाहणी केली. तब्बल ४५ मिनिटे न्यायाधीश आणि पक्षकारांनी ही पाहणी केली.

2008 मालेगाव बॉम्ब ब्लास्ट संदर्भात आज विशेष न्यायालयात या प्रकरणातील पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या घटनास्थळावरील 2 दुचाकी व पाच सायकली आज विशेष न्यायालयातील न्यायाधीश विनोद पडाळकर यांच्यासमोर सादर करण्यात आल्या. न्यायालयाच्या आवारात ठेवण्यात आलेल्या या वस्तूंचे न्यायाधीश व इतर साक्षीदारांनी स्वतः खाली येऊन पाहणी केली. न्यायाधीश विनोद पाडाळकर व इतर पक्षकारांनी तब्बल ४५ मिनिटे कोर्टाच्या आवारात आणण्यात आलेल्या दुचाकी व सायकलींची पाहणी केली.


सरकारी वकिलांनी या प्रकरणातील पंच क्र. २ यांची सरतापसणी घेतली असता या प्रकरणातील पंचांनी २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली मोटार सायकल ओळखली. या नंतर साध्वी प्रज्ञासिंगच्या वकिलांनी पंचाची उलट तपासणी केली. त्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी सुनावणी आज पुरती स्थगित करण्याची विनंती केली असता न्यायालयाने आजची सुनावणी तहकूब करून मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे.


दरम्यान या प्रकरणातील साध्वी प्रज्ञा सिंग हिच्या नावावर असलेली एलएमएल फ्रीडम या मोटार सायकलीसह इतर वस्तू न्यायालयात आणण्यात आल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details