मुंबई - शहरातील वांद्रे भागात बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या इमारतीतील 'टस्कनी' अपार्टमेंटमध्ये कोरोना रुग्ण सापडला आहे. त्यानंतर महापालिकेने ही इमारत सील केली आहे. पालिकेने 8 जूनला ही कारवाई केली.
कोरोना रुग्ण आढळल्यानंतर मलायका अरोराची इमारत महापालिकेकडून सील
देशभरात दररोज कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. देशात सर्वाधिक संक्रमित राज्य महाराष्ट्र आहे. अशा परिस्थितीत आता मुंबईच्या वांद्रे भागात असलेल्या अभिनेत्री मलाइका अरोराच्या इमारतीत कोरोना संक्रमित व्यक्ती सापडल्याचे समोर आले होते. त्यानंतर महानगरपालिकेनेही त्यावर आता शिक्कामोर्तब केल्याची बातमी आली आहे.
मलायका अरोरा
एका अहवालानुसार, 'कंटेनमेंट झोन' असे बॅनर असलेले मलायकाच्या इमारतीचे छायाचित्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाल्यापासून मलायका अरोरा आपला मुलगा अरहान आणि तिचा पाळीव कुत्रा 'कॅस्पर' यांच्याबरोबर क्वारंटाईन आहे.
मलायका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. काहीतरी ट्विट किंवा पोस्ट शेअर करुन चाहत्यांशी ती जोडलेली असते. परंतु, मलायका हिने अद्याप या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.