मुंबई:गणेश विसर्जनाची धामधुम असताना गुहागरमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट लागले. पाचेरी आगर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना घडली आहे. विसर्जनासाठी आलेल्या टेम्पोचे मिरवणुकीत ब्रेक फेल झाले. विसर्जन मिरवणुकीत टेम्पो घुसल्यानं 5 जण जखमी झाले आहेत. तर ड्रायव्हरसह एकाचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात करण्यात आलं दाखल करण्यात आलं.
- नाशिक शहरात गणपती विसर्जन दरम्यान नदी पात्रात पाच जण बुडाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. नाशिकरोड येथे गणपती विसर्जन दरम्यान वालदेवी नदीपात्रात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यात दोन महाविद्यालयीन तरुणाचा समावेश आहे. तर गोदावरी नदीत तीन जण बुडाले असल्याची माहिती समोर येत आहे.
दोघे जण बुडून वाहून गेले-सिन्नर फाटा चेहडी शिव येथील एका या इमारतीमधील सार्वजनिक मंडळाच्या गणपती विसर्जनसाठी प्रसाद सुनील दराडे हा आपला मित्र रोहित वैद्यनाथ नागरगोजे चेहडी येथील संगमेशर येथे गेले होते. यावेळी प्रसाद दराडे हा पाण्याजवळ गेल्यानं त्याचा पाय घसरून पाण्यात पडला. पोहता येत नसल्यानं तो पाण्यात बुडू लागला. तेव्हा शेजारी असलेल्या रोहित नागरगोजे यानं त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं दोघे जण बुडून वाहून गेले. तर दुसरी घटना वडनेर येथील महादेव मंदिर येथे घडली आहे.