हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज आपल्या १५ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीची अखेर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आज संध्याकाळी इन्स्टाग्रामवर धोनीने आपल्या फॅन्सना निवृत्तीची माहिती दिली. त्याच्या निर्णयावर संपूर्ण क्रिकेट जगच अवाक् झाले आहे. त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. तर त्याच्या फॅन्ससह विविध क्षेत्रातील मान्यवर त्याच्या भरीव कामगिरीबद्दल त्याचे कौतुक करत आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे काय? धोनीचा पहिला आणि त्याच्या शेवटच्या सामन्यातील एका घटनेमध्ये विलक्षण साम्य आहे. ते म्हणजे या दोन्ही सामन्यात धोनी धावबाद झाला होता.
धोनीबाबत विचित्र योगायोग.. आंतरराष्ट्रीय पदार्पण अन् कारकिर्दीचा अंतही धावबाद होऊनच..!
२३ डिसेंबर २००४ या वर्षी धोनी याने चितगांव येथे बांगलादेशविरुद्ध वन-डे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात धोनी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना धावबाद झाला होता. त्याला खलिद मसूद आणि तपस बैस्या या जोडीने धावबाद करून 'पॅव्हिलियन'मध्ये पाठवले होते. त्याच्या करिअरच्या पहिल्या सामन्यातच त्याला शुन्यावर माघारी परतावे लागले होते.
२३ डिसेंबर २००४ या वर्षी धोनीने चितगांव येथे बांगलादेशविरुद्ध वन-डे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात धोनी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना धावबाद झाला होता. त्याला खलिद मसूद आणि तपस बैस्या या जोडीने धावबाद करून 'पाविलियन'मध्ये पाठवले होते. त्याच्या करियरच्या पहिल्या सामन्यातच त्याला भोपळाही फोडता आला नव्हता.
त्यानंतर, १७ वर्षांनी म्हणजेच २०१९ या वर्षी विश्वचषकात भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्यात असाच प्रकार घडला होता. १० जुलै २०१९ रोजी खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात धोनी मार्टिन गुप्टीलच्या अचूक फेकीवर धावबाद झाला होता. त्याच्यावर भारतीय क्रिकेट संघाच्या खूप आशा होत्या. त्याच्या आऊट होण्याने स्टेडियमधील दर्शकांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव होते. त्यानंतर तो मागील सहा महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. त्याचे फॅन्स आतूरतेने त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होते. मात्र, आज धोनीने क्रिकेटपासून संन्यास घेतला. त्यामुळे, फॅन्समध्ये निराशा पसरली आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्हे तर किमान आयपीएलमध्ये तरी त्याला पाहता येईल या प्रतिक्षेत फॅन्स आहेत.