मुंबई :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा ( Governor Bhagat Singh Koshyari controversial statement ) निषेधार्थ तसेच राज्य सरकारवर हल्ला बोल करण्यासाठी मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान,महाविकास आघाडीच्या महामोर्चात ( Mahavikas Aghadi Mahamorcha ) महाविकास आघाडीचे प्रमुख नेत्यांसह राज्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. मविआच्या नेत्यांनी महामोर्चात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यचा निषेध करत त्यांना हटविण्याची मागणी केली. तसेच शिंदे-फडवणीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मविआच्या महामोर्चावर नेत्यांच्या प्रतिक्रिया : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Former CM Uddhav Thackeray ) यांनी महामोर्चात वादग्रस्त वक्तव्या करणाऱ्यांविरोधात जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, आज निघालेला हा महामोर्चा महाराष्ट्र द्रोह्यांचा शेवट करणारा मोर्चा आहे. महाराष्ट्र द्रोह्यांना गाडण्यासाठी आज आम्ही एकत्र जमलो आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Sharad Pawar ) म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळेच आज लाखोंच्या संख्येने मोर्चा एकत्र आला आहे. महापुरूषांबाबत राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा, अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवय रहाणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. महाराष्ट्रात सध्या सीमावादावरून राज्यातील अनेक गावे परराज्यात जाण्यासाठी मागणी करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपकडून महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी प्रयत्न केल्या जात असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी महामोर्चात केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या महामोर्चावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( DCM Devendra Fadnavis on Mahamorcha ) बोलताना त्यांनी या मोर्चाला नॅनो मोर्चा असे संबोधले आहे. त्याचबरोबर जे स्वतः वारंवार देवी - देवता, संत, महापुरुषांचा अपमान करत आहेत त्यांना मोर्चा काढण्याचा अधिकारच नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
मविआचा महामोर्चा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केले. या शिवाय भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटिल यांनी समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तसेच कर्मविर भाऊराव पाटील यांच्या विषयी वक्तव्य केले या मुळे समाजात रोष निर्माण झाला आहे. यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या विविध मुद्द्यांविरोधात महाविकास आघाडीने हल्ला बोल करत निषेध केला.