महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई महापालिका निवडणुकीबाबत शिवसेनेच्या भूमिकेला राष्ट्रवादीचाही पाठिंबा- जयंत पाटील - sanjay raut

मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही राऊत यांच्या वक्तव्याला दुजोरा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये शिवसेनेची भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

mumbai mnc election
मुंबई महापालिका निवडणूक एकत्र

By

Published : Oct 25, 2020, 3:13 PM IST

सांगली - मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही राऊत यांच्या वक्तव्याला दुजोरा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये शिवसेनेची भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक महाविकासआघाडी एकत्रपणे लढणार असल्याचे संकेत शिवसेना नेते संजय खासदार यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राऊत यांच्या भूमिकेचे स्वागत करत योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. या निवडणुकीबाबत आमची बैठकही झाल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट संकेत जयंत पाटील यांनी सुद्धा दिले आहेत. सांगलीच्या मिरजमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details