महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता सायंकाळी ७ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या - maharastra important news

पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दैना..रस्ते व रेल्वे वाहतूक मंदावली, सखल भागाला तलावाचे स्वरुप. मुंबईत पावसाचे बळी, शॉक लागून ३ जणांचा मृत्यू. दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटजवळील भिंत कोसळली; 3 जखमी. मेळघाटातल्या मनिषाला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी पै-पै जमवली; पण...विठुरायाच्या दर्शनासाठी 4 जुलैपासून मंदिर राहणार 24 तास खुले, ऑनलाईन दर्शन होणार बंद

महत्वाच्या बातम्या

By

Published : Jun 28, 2019, 6:54 PM IST

MUMBAI RAIN UPDATE : पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दैना..रस्ते व रेल्वे वाहतूक मंदावली, सखल भागाला तलावाचे स्वरुप

मुंबई - गेले चार महिने उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना बुधवारी रात्री पासून पडत असलेल्या पावसाने दिलासा दिला आहे. पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. ठाण्याच्या मखमली तलाव, मुंबईत सायन, हिंदमाता, अंधेरी, कुर्ला आदी सखल विभागात पाणी साचल्याने बेस्टचे बस मार्ग वळवण्यात आले आहेत. मुंबईच्या लोकल ट्रेनही उशिराने धावत असल्याने मुंबईकरांना आपल्या नियोजित ठिकाणी जाण्यास उशीर लागत आहे. वाचा सविस्तर...


मुंबईत पावसाचे बळी, शॉक लागून ३ जणांचा मृत्यू

मुंबई - गोरेगाव आणि अंधेरी येथे शॉक लागून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोनजण जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. वाचा सविस्तर...

दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटजवळील भिंत कोसळली; 3 जखमी


मुंबई - दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटजवळील भिंत कोसळली आहे. यात तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या भिंतीला लागून असलेल्या झोपडपट्टीत हे लोक रहात होते. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॅाक्टरांनी दिली. वाचा सविस्तर...

मेळघाट : मनिषाला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी पै-पै जमवली; पण...

अमरावती - मागील आठवड्यात चिखलदारा तालुक्यातील मोथा गावातून एक दुर्दैवी बातमी समोर आली. हंडाभर पाणी आणायला गेलेल्या पंधरा वर्षीय मनिषाची १० दिवसांपासून सुरू असलेली मृत्यशी झुंझ अखेर संपली. आरोग्य योजनेचा गाजावाजा करणाऱ्या एकाही योजनेचा तिला फायदा झाला नाही. गावकऱ्यांनी तिच्यासाठी लोकवर्गणी केली, पण नियती पुढे काहीच चालले नाही. ही दुर्दैवी कहाणी आहे मेळघातील आदिवासी कुटुंबातील मनीषा धांडेकरची. वाचा सविस्तर...

विठुरायाच्या दर्शनासाठी 4 जुलैपासून मंदिर राहणार 24 तास खुले, ऑनलाईन दर्शन होणार बंद


सोलापूर - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर 4 ते 22 जुलै दरम्यान भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे. दरम्यान 3 जुलै पासून ऑनलाईन दर्शन सुविधा बंद केली जाणार असल्याची माहिती पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. आषाढी वारीसाठी राज्यभरातून विविध साधू-संतांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details