महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता होणार जाहीर - result

उद्या (शनिवारी) ८ जुन रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल लागणार आहे.

निकाल

By

Published : Jun 7, 2019, 5:01 PM IST

Updated : Jun 7, 2019, 5:13 PM IST

मुंबई- महाराष्ट्र माध्यमिक बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. तर उद्या (शनिवारी) ८ जूनला दुपारी १ वाजता दहावीचा निकाल लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत सोशल मिडियावर अफवांचा पूर आला होता. त्यावर पडदा टाकत बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. उद्या दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावीचा निकाल ऑनलाईन पाहाता येणार आहे. विद्यार्थांना निकालाची प्रत संकेतस्थळावरुन घेता येणार आहे.

उद्या दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल पाहता येणार आहे. मागील आठवड्यापासून दहावीच्या निकालाबाबत व्हाट्सअॅप आणि इतर समाज माध्यमांवर चुकीच्या तारखा पसरवण्यात येत होत्या. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

maharashtraeducation.com, mahresult.nic.in, आणि mahahsscboard.maharashtra.gov.in. या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक मंडळाने निकालाबाबत एक पत्रक जारी केले आहे.

मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या ९ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते २२ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते.

Last Updated : Jun 7, 2019, 5:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details