मुंबई : महाराष्ट्रातून ओमानमध्ये गेलेल्या आणि छळ झालेल्या अनेक महिलांच्या कुटुंबाकडून राज्य महिला आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या ( Maharashtra women Harassment in Oman ) आहेत. या महिलांना ट्रॅव्हल एजंट कडून घरगुती मदतीसाठी पाठवण्यात आल्या होत्या. गेल्या सहा महिन्यापासून या महिला भारतीय दूतावासपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अनेक अडथळे आणि आव्हान असल्यामुळे भारतीतावासापर्यंत त्या पोहोचू शकत नाही.
Women Harassment : संतापजनक! महाराष्ट्रातील महिलांचा ओमानमध्ये छळ; राष्ट्रीय महिला आयोगाकडे मदतीची मागणी - National Commission for Women
महाराष्ट्रातील अनेक तालुक्याच्या ठिकाणाहून आणि गावाच्या ठिकाणाहून महिला आपल्या रोजगारासाठी दुबई किंवा ओमान या ठिकाणी जातात. मात्र त्यांना तिकडे नेल्यावर बेदम महारहाण केली जात असल्याचे समोर आले ( Maharashtra women Harassment in Oman ) आहे.
रोजगारासाठी देशाबाहेर जातात :महाराष्ट्रातील अनेक तालुक्याच्या ठिकाणाहून आणि गावाच्या ठिकाणाहून महिला आपल्या रोजगारासाठी दुबई किंवा ओमान या ठिकाणी जातात. मात्र त्यांना तिकडे नेल्यावर बेदम महारहाण केली जाते. त्रास दिला जातो. छळ केला जातो अत्याचार होतो. यासंदर्भातल्या काही तक्रारी राज्य महिला आयोगाकडे दाखल झाल्या. या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे की," ज्या महिला ओमानमध्ये गेला आहेत आणि त्यांचा छळ झालेला आहे अशा अनेक महिलांच्या कुटुंबीयांकडूनच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांना ट्रॅव्हल एजंट कडून मदतीसाठी पाठवण्यात आले होते व गेल्या सहा महिन्यापासून या महिला भारतीय दुतावासपर्यंत तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओ कॉल संदेश इतर माध्यमाद्वारे त्यांची सुटका करावी असं त्यांचं म्हणणं आहे."
राष्ट्रीय महिला आयोगाकडे मागणी :यासंदर्भात महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष रेखा शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केलेली ( Help Request to National Commission for Women) आहे. तसेच महाराष्ट्रातील महिलांचा ओमानमध्ये हा होणारा छळ थांबवा त्यांची सुटका करावी. या महिलांना परत आपल्या घरी मायदेशी आणि राज्यात यायचं आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत तातडीने गंभीर दखल घेत पावलं उचलावे ; अशी मागणी त्या पत्रामध्ये रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केलेली ( Maharashtra Women Commission President Rupali Chakankar) आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांना लिहिलेले पत्र सोबत जोडलेले आहे.