मुंबई - किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दोन्ही सभागृहात मंगळवारी सोमय्या व्हिडिओ प्रकरण चांगलेच गाजले. विरोधकांनी भाजपवर टीका करत, प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याप्रकरणाची आता महिला आयोगानेही दखल घेतली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ माध्यमांवरून प्रसारित झाला आहे. विविध सामाजिक संस्थाकडून सदर व्हिडिओबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास विचारणा होत आहे. तरी उपरोक्त प्रकरणी चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत - रुपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग
सखोल व वरिष्ठ स्तरावर चौकशी - विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. हा विषय अतिशय गंभीर आहे. राजकारणात असे प्रसंग येतात ज्याने माणसाचे संपूर्ण आयुष्य पणाला लागते. तुमच्याकडे काही माहिती असेल तीसुद्धा द्या. या संदर्भात बिलकुल काळजी करू नका. याची अतिशय सखोल व वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
विधिमंडळात विरोधक आक्रमक - किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर याचे पडसाद विधान परिषदेतसुद्धा उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा मुद्दा उपस्थित केला. केंद्राची सुरक्षा घेऊन महिलांना ब्लॅकमेल केले जात आहे. ८ तासाचे व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहे. ही व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे. आपले सरकार नैतिकतेबद्दल बोलते. पण किरीट सोमय्या यांच्यासारखे दलाल महाराष्ट्रात महिलांवर अच्याचार करत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे.
ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक आक्रमक- किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला शेन लावून जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी आक्रमक शिवसैनिकांच्यावतीने किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच नाशिक, बीड, मुंबई, सोलापूर याठिकाणीही ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या व्हिडिओ प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.
हेही वाचा -
- Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्या कथित व्हिडिओ प्रकरणी विरोधक आक्रमक; 'दलाल महाराष्ट्रात महिलांवर...'
- Ashok Chavan On Kirit Somaiya : किरीट सोमैया यांच्या कथित व्हिडिओची चौकशी करा - अशोक चव्हाण
- Kirit Somaiya Viral Video : भाजपने किरीट सोमय्यांचा बळी दिला; Watch Video