महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येत्या 6 महिन्यात महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होईल, पर्यावरण मंत्र्यांना विश्वास

महाराष्ट्राने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीच्या कायद्याचा केंद्र सरकार कडून अभ्यास करण्यात येत असून लवकरच देशभरात हा कायदा लागू होणार आहे.

रामदास कदम, पर्यावरणमंत्री

By

Published : Sep 5, 2019, 8:38 PM IST

मुंबई - पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जगभरात ऐरणीवर आलेल्या प्लास्टिक बंदीचा विषय महाराष्ट्राने अतिशय गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे येत्या 6 महिन्यात दररोजच्या वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी आणून महाराष्ट्र 100 टक्के प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

6 महिन्यात महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त

हेही वाचा-धुळ्यात दोन टन प्लास्टिक माल जप्त; प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि धुळे महानगरपालिकेचे कारवाई

महाराष्ट्राने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीच्या कायद्याचा केंद्र सरकार कडून अभ्यास करण्यात येत असून लवकरच देशभरात हा कायदा लागू होणार आहे. त्यामुळे आपले उत्सवही प्लास्टिक मुक्त व्हावेत यासाठी सर्वांच्या सहकार्यांची गरज असल्याचे कदम यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details